संकटात हिवाळे कुटुंबाला अब्दुल आमेर यांचा मदतीचा हात; वडिलांचा सामाजिक सेवेचा वारसा जपला! आर्थिक मदत देत दुःखाच्या प्रसंगी दिला आधार

अंभईतील विश्वनाथ हिवाळे यांच्या निधनानंतर कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

संकटात हिवाळे कुटुंबाला अब्दुल आमेर यांचा मदतीचा हात; वडिलांचा सामाजिक सेवेचा वारसा जपला! आर्थिक मदत देत दुःखाच्या प्रसंगी दिला आधार
संकटात हिवाळे कुटुंबाला अब्दुल आमेर यांचा मदतीचा हात; वडिलांचा सामाजिक सेवेचा वारसा जपला! आर्थिक मदत देत दुःखाच्या प्रसंगी दिला आधार

अंभई (ता. सिल्लोड) दि २५ :- सामाजिक बांधिलकी जपत अडचणीच्या काळात गरजवंतांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद अंभई सर्कलचे सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी कायम ठेवली आहे.

अंभई येथील विश्वनाथ हिवाळे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे हिवाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबासमोर आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर अब्दुल आमेर यांनी आज अंभई येथे हिवाळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. वडील आमदार अब्दुल सत्तार यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्य आणि गरजूंच्या मदतीचा वारसा पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न या माध्यमातून दिसून आला.

संकटात माणसाच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी! दुःखाच्या प्रसंगी केवळ सांत्वन न करता शक्य ती मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामू अण्णा गव्हाणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, गुड्डू आप्पा नगरे, अरविंद शिंदे, मधुकर जाधव, मोहसीन देशमुख, समाधान भुईगळ, गजानन चाथे यांच्यासह हिवाळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित