सामाजिक कार्याची दखल; अशरफ पठाण यांची ऑल इंडिया उलमा बोर्डच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती

वक्फ संपत्तीचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी

सामाजिक कार्याची दखल; अशरफ पठाण यांची ऑल इंडिया उलमा बोर्डच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशरफ पठाण हुसेन खान यांची ऑल इंडिया उलमा बोर्डच्या मुतवल्ली विंग / वक्फ विंगच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष नौशाद सिद्दीकी तसेच अल्लामा बुनाई आणि हाजी सोहेल पटेल अशर्फी यांच्या मान्यतेने त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी आसिफ शेख, अजगर भाई आणि अॅड. फातेमा पठाण यांची उपस्थिती होती.

अशरफ पठाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, जनहिताच्या तसेच विविध संघटनात्मक क्षेत्रांत सक्रिय योगदान दिले आहे. समाजातील वंचित घटकांचे प्रश्न, सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार आणि जनहिताच्या विविध विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया उलमा बोर्डाने त्यांच्यावर राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी सोपविली आहे.

या पदाच्या माध्यमातून वक्फ संपत्तीचे संरक्षण, वक्फ संस्थांचे सक्षमीकरण, सामाजिक सलोखा वाढविणे, शिक्षणाचा प्रसार करणे तसेच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प अशरफ पठाण यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस नवी दिशा देणारी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित