प्रदेशाध्यक्ष अॅड. अशोक बेदरे यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची आढावा बैठक; संघटनात्मक बळकटीकरणावर भर

प्रदेशाध्यक्ष अॅड. अशोक बेदरे यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची आढावा बैठक; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
प्रदेशाध्यक्ष अॅड. अशोक बेदरे यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची आढावा बैठक; संघटनात्मक बळकटीकरणावर भर

लातूर दि २१ :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान लातूर येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अशोक बेदरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्ष संघटनेची सद्यस्थिती, लीगल सेलची पुनर्बांधणी आणि संघटनात्मक विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा व तालुकास्तरावर लीगल सेलची संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे तसेच संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

लीगल सेलच्या माध्यमातून पक्ष संघटनेला कायदेशीर बळ देण्यासोबतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच पक्ष संघटना आणि लीगल सेल यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस लीगल सेलचे लातूर जिल्हाध्यक्ष अॅड. आशिष चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. दीपक गटकर, प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश पाटील, लीगल सेलचे शहराध्यक्ष अॅड. राजकुमार गंडले, ओबीसी सेलचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर कत्ते, युवकचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. निशांत वाघमारे, शहराध्यक्ष प्रवीण साळुंखे, शहर सरचिटणीस अॅड. सुनील फावडे, लातूर ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज कातळे, सचिन औरंगे, हर्षवर्धन लोकरे, अथर्व पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात लीगल सेलची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायदेशीर आधार देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. आगामी काळात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक विस्तार आणि कायदेशीर जनजागृतीला गती देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित