मौलाना आझाद एकता फाउंडेशनच्या औरंगाबाद जिल्हा सचिवपदी जुबेर देशमुख यांची नियुक्ती

युसूफ अबरानी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्तीपत्र प्रदान; सामाजिक व शैक्षणिक कार्याची मिळाली जबाबदारी

मौलाना आझाद एकता फाउंडेशनच्या औरंगाबाद जिल्हा सचिवपदी जुबेर देशमुख यांची नियुक्ती
मौलाना आझाद एकता फाउंडेशनच्या औरंगाबाद जिल्हा सचिवपदी जुबेर देशमुख यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ११ :- मौलाना आझाद एकता फाउंडेशनच्या औरंगाबाद जिल्हा सचिवपदी जुबेर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फाउंडेशनचे आदरणीय संरक्षक जनाब युसूफ अबरानी यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीपत्र देऊन नवीन जबाबदारी सोपविण्यात आली.

या नियुक्तीनंतर जुबेर देशमुख यांच्यावर जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देणे, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे तसेच मौलाना अबुल कलाम आझाद यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यात फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि सामाजिक कार्याची माहिती वेळोवेळी मुंबई येथील केंद्रीय कार्यालयाला पाठविण्याच्या सूचनाही नियुक्तीपत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

फाउंडेशनचे अध्यक्ष युसूफ अन्सारी, उपाध्यक्ष शौकत पटेल, सरचिटणीस मुजीबुर रहमान सिद्दीकी आणि कोषाध्यक्ष सादिक खान यांनी जुबेर देशमुख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा सचिवपदाची जबाबदारी मिळाल्याने जुबेर देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित