वारकऱ्यांसाठी जनसेवा प्रतिष्ठानचा सेवाभाव : चहा-नाश्ता, महाप्रसाद, आरोग्य शिबिर आणि कीर्तन सेवा
महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे, (प्रतीनीधी) दि २२ जून:- संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामी दरम्यान घोरपडी गावातील जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून वारकऱ्यांना सुस्वागतम करण्यात आले.
या उपक्रमांत सकाळी चहा-नाश्ता, दुपारी महाप्रसाद, भजन-कीर्तन व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी समाजसेवेचा एक आदर्श उभा राहिला.
कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र खैरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी दिंडी प्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मुंढवा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया डमरे, पोलीस निरीक्षक सुनिता राठोड, पत्रकार प्रयागा होगे, अनिल राणे, सुवर्णा कांबळे, विठ्ठल मदने, मनीषा सोनवणे, रोहिणी आवड, मीना अटलूर, यास्मिन शेख, मीना जरांडे, लीना भास्कर, राजश्री मुदलियार, अलका शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सेवाभावी उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत जनसेवा प्रतिष्ठानचे आभार मानले.