राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ! राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंञी म्हणून मा.सुनेञा अजितदादा पवार यांनी शपथ घेतली
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि ३१ :- महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील लोकभवन येथे साधेपणाने पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी पदभार स्वीकारला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवरांनीही उपस्थिती लावली.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
— सत्तेच्या नव्या समीकरणात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे.