"फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, की बेछूट वक्तव्यांचा अखाडा?"

"फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, की बेछूट वक्तव्यांचा अखाडा?"

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १८ :– हा महाराष्ट्र फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण आजच्या राजकारणात नेत्यांच्या तोंडून घाणेरडी भाषा आणि बेछूट वक्तव्यांचा मारा सुरू आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेलं वक्तव्य इतकं गलिच्छ आहे की, ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारं ठरत आहे.

फक्त पडळकरच नाही, तर भाजपाचे मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी (अजीत पवार गट) चे संग्राम जगताप हे देखील रोज नवे वादग्रस्त विधान करून वातावरण गढूळ करत आहेत. प्रश्न असा की – हे सगळं फक्त वैयक्तिक उर्मीट बोलणं आहे का? की पक्षश्रेष्ठींच्या मौनसंमतीमुळे या आमदारांना उधळं बोलण्याची मोकळीक मिळते?

शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त, बेरोजगार तरुण चिंतेत आणि सामान्य जनता महागाईच्या तडाख्यात होरपळत असताना, राज्याचे निवडून आलेले प्रतिनिधी लोकांच्या जखमा विसरून गलिच्छ वाणीच्या स्पर्धेत उतरले आहेत. महाराष्ट्राच्या सभ्य राजकीय परंपरेवर ही थेट चपराक आहे.

 जनतेचे प्रश्न धुळीत, आणि नेत्यांचे शब्दराजकारण मात्र रंगात – कुठे चाललाय आपला महाराष्ट्र?