अंमली पदार्थ प्रकरणातील मुख्य सुत्रधार अश्पाकसह तिघे जेरबंद; 19.44 लाखांचा मुद्देमाल जप्त

अंमली पदार्थ प्रकरणातील मुख्य सुत्रधार अश्पाकसह तिघे जेरबंद; 19.44 लाखांचा मुद्देमाल जप्त
अंमली पदार्थ प्रकरणातील मुख्य सुत्रधार अश्पाकसह तिघे जेरबंद; 19.44 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- अंमली पदार्थ प्रकरणात फरार असलेला मुख्य सुत्रधार शेख अश्पाक शेख ईसाक याच्यासह त्याचे दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे मध्यरात्री धाड टाकून अटक केली. या कारवाईत तब्बल 19 लाख 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्हा जिन्सी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 28/2026 अन्वये कलम 8(क), 21(क), 22(क), 29 एनडीपीएस कायदा तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम अंतर्गत दाखल आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोउपनि प्रविण साहेबराव वाघ (गुन्हे शाखा) आहेत.

गुप्त माहितीनंतर नाशिकमध्ये सापळा

दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी मा. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, फरार आरोपी नाशिक येथे लपून बसला आहे. त्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पथक नाशिकला रवाना झाले.

नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने वडाळा नाका येथील हॉटेल संफरॉन येथे छापा टाकण्यात आला. त्यावेळी खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले—

शेख अश्पाक शेख ईसाक (रा. रविंद्रनगर, शहाबाजार)

पठाण दाऊद मुनावर खान (रा. बायजीपुरा)

सरफराज मिर्झा हाफीज बेग (रा. शहाबाजार)

अटक करताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना जेरबंद केले.

19.44 लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईदरम्यान आरोपींकडून—

14 लाख रुपये किंमतीची वोक्सवॅगन पसाट कार

4 लाख 74 हजार 500 रुपये रोख रक्कम

70 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल हँडसेट

असा एकूण 19,44,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अन्य आरोपीही जेरबंद

तसेच सिटीचौक पोलीस ठाणे येथील गु.र.नं. 29/2026 मधील आरोपी शेख फरदीन अब्दुल रज्जाक (रा. शहाबाजार) यालाही अटक करण्यात आली असून न्यायालयातून पीसीआर मिळविण्यात आली आहे. महिला आरोपी इशरत अकिब शेख हिच्याविरोधात ट्रान्सफर वॉरंट घेण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले व सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

📞 शहरात कुठेही अंमली पदार्थ विक्रीबाबत माहिती असल्यास डायल 112 किंवा 9226514001 वर संपर्क साधा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

👉 अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र — शहर सुरक्षित ठेवण्याचा निर्धार कायम!