अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात 48 तासांत शोध व आरोपी अटक करण्याची मागणी!एकता संघटनेचा इशारा

एकता संघटनेचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात 48 तासांत शोध व आरोपी अटक करण्याची मागणी!एकता संघटनेचा इशारा
अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात 48 तासांत शोध व आरोपी अटक करण्याची मागणी!एकता संघटनेचा इशारा

महाराष्ट्र वाणी 

जळगाव दि १८ :- दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी एका धर्मगुरूंच्या 15 वर्षे 9 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याचा प्रकार गंभीर स्वरूप धारण करत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक 102/26 दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप फक्त बीएनएस कलम 137(2) लावण्यात आल्याने एकता संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

संघटनेचे म्हणणे आहे की मुलगी कायदेशीरदृष्ट्या अल्पवयीन असल्याने तिची कोणतीही तथाकथित “संमती” ग्राह्य धरता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये परिस्थितीनुसार पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

ही घटना संवेदनशील मानली जात असून पीडित कुटुंब एका धर्मगुरूंचे असल्याने प्रशासनाने तातडीने पारदर्शक आणि निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा अफवा आणि सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा देण्यात आला.

एकता संघटनेच्या प्रमुख मागण्या

एफआयआरमध्ये तात्काळ पॉक्सो व आवश्यक बीएनएस कलमे जोडावीत

आरोपीला त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी

तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवून SIT स्थापन करावी

48 तासांत लेखी प्रगती अहवाल द्यावा

शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व अफवा नियंत्रण यंत्रणा सक्रिय करावी

पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे

फारूक शेख यांचे प्रशासनाला आवाहन

संघटनेचे समन्वयक फारूक शेख म्हणाले,

“हा संघर्ष कोणत्याही प्रकारचा फसाद निर्माण करण्यासाठी नाही, तर एका निष्पाप अल्पवयीन मुलीला सुरक्षित परत आणण्यासाठी आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत.”

48 तासांत मुलगी न मिळाल्यास धरणे आंदोलन

प्रतिनिधिमंडळाने आरडीसी महेश चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

संघटनेने स्पष्ट केले की, जर 48 तासांत मुलगी कुटुंबाकडे सुपूर्द झाली नाही, तर शुक्रवारी दुपारी 3 ते 5 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन करण्यात येईल.

 शेवटी संघटनेने शहरवासियांना शांतता राखण्याचे आणि कायद्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

— वाचत राहा महाराष्ट्र वाणी, सत्य आणि न्या

यासाठी आवाज!