“साडी-चोळी देऊन जिजाऊच्या लेकीच्या रक्षणासाठी उभा!” – दीपक केदारांचा एल्गार

“साडी-चोळी देऊन जिजाऊच्या लेकीच्या रक्षणासाठी उभा!” – दीपक केदारांचा एल्गार
“साडी-चोळी देऊन जिजाऊच्या लेकीच्या रक्षणासाठी उभा!” – दीपक केदारांचा एल्गार

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. २२ :- चिखला येथील महिलेसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातील वातावरण तापले असून ऑल इंडिया पैंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “ही घटना एका रात्रीत घडलेली नाही, यामागे पार्श्वभूमी आहे. सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या संजीवनीताईंवर सुनियोजित हल्ला करण्यात आला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“समाजकंटक प्रवृत्तीला जात नसते, पण काही जण मुद्दाम जातीचा रंग देत आहेत. एका महिलेच्या इज्जतीवर हात टाकला गेला, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे,” असे ते म्हणाले.

⚖️ ‘मोक्का लावा, आरोपींना तात्काळ अटक करा’

केदार यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली की आरोपींवर MCOCA (मोक्का) अंतर्गत कारवाई करावी. “आमदारांनी आरोपींना पाठीशी घालू नये. आम्हाला सगळं समजतं. २४ तासांत अटक झाली पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.

“खैरलांजी आपण पाहिली, सुरेखा होता होता राहिली. आता तरी महिलांच्या अस्तित्वासाठी एक व्हा,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले.

🛡️ “मी भीमसैनिक भाऊ… साडी-चोळी देऊन रक्षणाचा शब्द”

घटनेतील पीडित महिलेला “साडी-चोळी” देत संरक्षणाचा शब्द देत केदार म्हणाले,

“माझ्या बहिणीचे कपडे फाडले, मी तिचा भाऊ ‘भीमसैनिक’ आहे. तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.”

त्यांनी पुढे छत्रपतींच्या आदर्शांचा उल्लेख करत म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात महिलांना सन्मान दिला. तीच चळवळ आजही जिवंत आहे. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे, हे विसरू नका.”

🏛️ “हा जातीय संघर्ष नाही, समाजकंटकांविरोधातील लढा”

“हा जातीयवादाचा प्रश्न नाही. समाजकंटक प्रवृत्तीविरुद्धचा लढा आहे. महापुरुष जातीचे नसतात, ते प्रेरणास्थान असतात,” असे सांगत त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले.

“एका मुलीचे कपडे फाडले जातात आणि काही नेते शांत बसतात, हे प्रवृत्तीला बळ देणारे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

🚨 पोलिसांवरही सवाल

केदार यांनी पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“वातावरण खराब होत असल्याची माहिती पोलिसांना होती, तरी त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. हे सुनियोजित प्रकरण आहे का? याची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.

✊ एकत्र या, गाव वाचवा!

शेवटी त्यांनी गावकऱ्यांना आवाहन केले –

“एकत्र या, सामाजिक सलोखा राखा, गावाला महापुरुषांची खरी ओळख करून द्या. अन्याय सहन केला जाणार नाही.”

👉 महिलांच्या सन्मानासाठी आता समाज एकवटणार का? की पुन्हा शांतता राखून अन्याय झाकला जाणार?