टाकळी राजेरायमध्ये सहकाराची नवी झेप! जिल्हा बँकेच्या शाखेचे नव्यावास्तुत दिमाखात उद्घाटन

टाकळी राजेरायमध्ये सहकाराची नवी झेप! जिल्हा बँकेच्या शाखेचे नव्यावास्तुत दिमाखात उद्घाटन
टाकळी राजेरायमध्ये सहकाराची नवी झेप! जिल्हा बँकेच्या शाखेचे नव्यावास्तुत दिमाखात उद्घाटन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची टाकळी राजेराय येथील शाखा आता नव्या वास्तूत सुरू झाली असून, या शाखेचे उद्घाटन बँकेचे संचालक तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

टाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशस्त वास्तूमध्ये ही शाखा सुरू करण्यात आली आहे. या नवीन शाखेमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांना बँकिंग सुविधा अधिक सुलभ व वेगवान मिळणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यास खुलताबाद तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलासदादा गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिलभाऊ श्रीखंडे, माजी संचालक शंकरकाका आधाने, संस्थेचे चेअरमन राजेंद्र भागडे, विरमगाव विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन कृष्णा आधाने, ज्येष्ठ नेते सत्तार पटेल, सोमीनाथ गायकवाड, अशोक लगड, कय्युम पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच बँकेचे तालुका लोन ऑफिसर काळे, टाकळी व विरमगाव संस्थांचे सर्व संचालक, गटसचिव, परिसरातील शेतकरी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी अशा शाखांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नव्या शाखेमुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

👉 “सहकाराच्या बळावर गावाचा विकास – टाकळी राजेरायचा नवा अध्याय सुरू!”