छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य! आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुका निरीक्षक नियुक्त्या पूर्ण
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ जुलै :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतीश चव्हाण यांनी स्वीकारल्यानंतर संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी विविध तालुक्यांसाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करून नव्या जोमाने पक्षबांधणीस प्रारंभ केला.
या नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत –
🔹 कन्नड तालुका निरीक्षक – श्री. दिलीप बनकर
🔹 छत्रपती संभाजीनगर तालुका निरीक्षक – श्री. आप्पासाहेब निर्मळ
🔹 फुलंब्री तालुका निरीक्षक – श्री. महेश उबाळे
🔹 पैठण तालुका निरीक्षक – श्री. अशोक गायकवाड
🔹 सिल्लोड व सोयगाव तालुका निरीक्षक – श्री. राहुल डकले
🔹 जिल्हा सरचिटणीस – श्री. नितीन धुमाळ
या सर्व नेत्यांना आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व नविन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.
संघटनात्मक बांधणीला वेग! जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न!