प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी लासूर स्टेशन शहर काँग्रेसचे पोलीस ठाण्यात निवेदन

प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी लासूर स्टेशन शहर काँग्रेसचे पोलीस ठाण्यात निवेदन
प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी लासूर स्टेशन शहर काँग्रेसचे पोलीस ठाण्यात निवेदन

महाराष्ट्र वाणी 

लासूर स्टेशन,दि. २६ :- हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लासूर स्टेशन शहर काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त करत हल्लेखोरांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार हे तळागाळात काम करणाऱ्या कष्टकरी व शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व मानले जाते. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्या ठाम आणि बिनतोड युक्तिवादाने ते विरोधकांची बोलती बंद करतात. पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना ते विरोधी पक्ष, विशेषतः भारतीय जनता पक्ष यांच्यावर जोरदार टीका करत असल्याने काही जणांनी द्वेषातून कट रचल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पुणे येथे तुषार जामधडे याने आपल्या सहकाऱ्यासह हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. संविधानिक मूल्ये जपणाऱ्या देशात कोणाचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा शहर काँग्रेसने दिला.

या प्रकरणी तुषार जामधडे व त्याच्या सहकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत लासूर स्टेशन पोलीस चौकी येथे निवेदन देण्यात आले. पीएसआय काळे यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी शहराध्यक्ष किशोर पवार, मोहनराव खंडागळे, भास्कर बनसोडे, ज्ञानेश्वर वाघचौरे, रिचर्ड बत्तीशे, सिद्धार्थ गायकवाड, नागेश बागुल, नसीर टेलर, रियाज भाई यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👉 लोकशाहीत मतभिन्नता असू शकते, पण हिंसेला कधीच स्थान नसते — आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.