महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये नवे महापौर नियुक्त! भाजपचा दबदबा

महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये नवे महापौर नियुक्त! भाजपचा दबदबा

✍️ महाराष्ट्र वाणी 

मुंबई (प्रतिनिधी), दि.१३ :- महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये नव्या महापौरांची नियुक्ती करण्यात आली असून राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे.

या महापौर निवडीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक महानगरपालिकांवर आपला प्रभाव कायम ठेवत मोठा दबदबा निर्माण केला आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि इतर पक्षांनाही काही ठिकाणी नेतृत्वाची संधी मिळाली आहे.

राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये नवनियुक्त महापौरांची यादी पुढीलप्रमाणे आहे —

महानगरपालिका – नवनियुक्त महापौर (पक्षासह)

लातूर – जयश्री सोनकांबळे (काँग्रेस)

वसई-विरार – अजीव पाटील (बहुजन विकास आघाडी)

मालेगाव – शेख नसरीन बानो खालिद (इस्लाम पार्टी)

कल्याण-डोंबिवली – हर्षाली चौधरी (शिवसेना – शिंदे गट)

ठाणे – शर्मिला पिंपळोलकर (शिवसेना – शिंदे गट)

उल्हासनगर – अश्विनी निकम (शिवसेना – शिंदे गट)

अहिल्यानगर – ज्योती गाडे (राष्ट्रवादी काँग्रेस – सुनेत्रा पवार)

परभणी – सय्यद इकबाल (शिवसेना – उद्धव ठाकरे)

पुणे – मंजुषा नागपुरे (भाजप)

मुंबई – रितु तावडे (भाजप)

नाशिक – हिमगौरी आहेर-आडके (भाजप)

छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर (भाजप)

पिंपरी-चिंचवड – रवी लांडगे (भाजप)

सोलापूर – विनायक कोंड्याल (भाजप)

जालना – वंदना मगरे (भाजप)

याशिवाय चंद्रपूर, धुळे, अमरावती, सांगली, पनवेल, भिवंडी-निजामपूर, जळगाव, कोल्हापूर यांसारख्या महानगरपालिकांमध्येही भाजपने महापौरपदावर वर्चस्व मिळवले आहे.

राजकीय समीकरणांवर परिणाम

या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

✨ वाचकांनो, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र वाणी सोबत राहा!