चितेगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६ जणांविरुद्ध गुन्हा, १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
बिडकीन (प्रतिनिधी) दि ११ :- चितेगाव (ता. पैठण) येथील जि.प. शाळेमागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बिडकीन पोलिसांनी छापा टाकून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगार साहित्य आणि मोटारसायकली असा एकूण ₹1 लाख 87 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक मनोज एकनाथ पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे 10 जून रोजी दुपारी 2.15 वाजता चितेगाव येथील J.S. Town Plotting परिसरामागील मोकळ्या जागेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी काही व्यक्ती पत्त्यावर पैसे लावून "झन्ना मन्ना" नावाचा जुगार खेळ खेळत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी सखाराम बाबुराव पवार, रत्नाकर सदानंद गायकवाड, सलमान नजीर शेख, अजय राधाकिसन थोरात, प्रदीप आनंद धनराज आणि शेख राजू शेख अयुब यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ₹6,720 रोख रक्कम, 4 मोबाईल हॅन्डसेट, जुगाराचे पत्ते आणि 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी HC सोमनाथ जाधव यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास ASI अशोक सोकटकर करीत आहेत.
या कारवाईत पोउपनि मनोज पाटील, पोउपनि संभाजी झिंजुर्डे, वाल्मीक निकम, वाजेद शेख, स्वप्नील दिलवाले आणि योगेश वाघमोडे यांनी सहभाग घेतला.
👉 बेकायदेशीर जुगार अड्ड्यांविरोधातील पोलिसांची कारवाई सुरू असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचत रहा — महाराष्ट्र वाणी!