चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन; १४ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा

चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन; १४ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा
चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन; १४ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे, (प्रतिनिधी) दि२५ जून :- रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने समाज कल्याण विभागाचे पुणे जिल्हा अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या हस्ते सादर करण्यात आले असून, चर्मकार समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी यामधून करण्यात आली आहे.

संजूभाऊ बनसोड यांनी निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केले की, येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी. शासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर दिनांक १४ जुलै २०२५ रोजी समाज कल्याण कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रसंगी संघटनेचे खजिनदार सुनील राठी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 चर्मकार समाजाचा आवाज बुलंद - मागण्या मान्य न झाल्यास संघर्ष अटळ!