"एक हात मदतीचा" उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

"एक हात मदतीचा" उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
"एक हात मदतीचा" उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र वाणी न्युज 

उर्जानगर (चंद्रपूर), २३ जून :– ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या "एक हात मदतीचा" या उपक्रमांतर्गत उर्जानगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समितीचे जिल्हाध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापन समितीचे हंगामी अध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन यांसारखे आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

या उपक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदार यांचे मार्गदर्शन लाभले असून, गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे पारखी यांनी सांगितले.

कार्यक्रमात मुख्याध्यापिका सुरेखा वांढरे, शाळा समिती सदस्य नामन पवार, अर्चना आंबिलकर, लक्ष्मी तांडेकर, अविनाश थोरात, शिक्षक नांदे सर, गादेवार मॅडम तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला.