आर्किटेक्ट बनली मानसी शितोळे : पुणे विद्यापीठातून बी.आर्क पदवी संपादन

आर्किटेक्ट बनली मानसी शितोळे : पुणे विद्यापीठातून बी.आर्क पदवी संपादन
आर्किटेक्ट बनली मानसी शितोळे : पुणे विद्यापीठातून बी.आर्क पदवी संपादन

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे दि २६ :- आपल्या लेकरांनी उच्च शिक्षण घेऊन पदवी संपादन केली आणि त्या पदवीदान सोहळ्याला पालक म्हणून उपस्थित राहण्याचा क्षण हा प्रत्येकासाठी अभिमानाचा असतो. असाच अभिमानाचा क्षण शितोळे कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला आहे.

शितोळे दांपत्यांची ज्येष्ठ कन्या मानसी आनंद शितोळे हिने पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch) ही पदवी मिळवली असून काल तिच्या महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला.

मानसीला लहानपणापासूनच आर्किटेक्चर या क्षेत्राची आवड होती. त्याच आवडीच्या विषयात तिने अभ्यास करून पदवी मिळवल्याने तिचा आनंद दुणावला आहे. मुलीच्या आवडीनुसार शिक्षण घेण्यासाठी आम्ही मदत करू शकलो याचा आम्हालाही पालक म्हणून प्रचंड अभिमान वाटतो, अशी भावना आनंद शितोळे यांनी व्यक्त केली.

🌺 “जिंदगी गुलजार है…!!” असे म्हणत शितोळे कुटुंबाने आपल्या आनंदाचा उधळण केली.

✨ “मुलींच्या यशातच पालकांचा खरा मान-सन्मान दडलेला असतो!” ✨

🌟 महाराष्ट्र वाणी – तुमच्या भावना आणि बातम्यांना आवाज 🌟