अंभईत शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली; अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली जनसागर उसळला

अंभईत शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली; अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली जनसागर उसळला
अंभईत शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली; अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली जनसागर उसळला

महाराष्ट्र वाणी 

अंभई दि ३१ :- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला. शिवसेनेचे भगवे झेंडे, तसेच जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

या प्रचार रॅलीत शिवसेनेच्या स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी विरोधकांच्या अपयशी कारभारावर जोरदार टीका करत, विकासाच्या नावाखाली केवळ राजकारण करणाऱ्यांना जनता आता जागा दाखवणार असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.

रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करणारी शिवसेनाच जनतेची खरी ताकद असल्याचे सांगण्यात आले. जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या रॅलीत अंभई गटाचे उमेदवार अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, पंचायत समिती उमेदवार रजनीताई विश्वनाथ नगरे यांच्यासह नगरसेवक रऊफ बागवान, अकील वसईकर,दामु अण्णा गव्हाणे, मोहसीन देशमुख, रामदास पाटील दुंतोडे, रब्बानी शहा, गुड्डू अप्पानगरे, सय्यद महेमूद, डॉ. जुनेद देशमुख, ज्ञानेश्वर लकडे तसेच शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

— विकासाचा आवाज, शिवसेनेच्या विजयाचा नारा!