BLO च्या हलगर्जीपणावर काँग्रेस आक्रमक; घराघरांत जाऊन मॅपिंग करण्याची मागणी

BLO च्या हलगर्जीपणावर काँग्रेस आक्रमक; घराघरांत जाऊन मॅपिंग करण्याची मागणी
BLO च्या हलगर्जीपणावर काँग्रेस आक्रमक; घराघरांत जाऊन मॅपिंग करण्याची मागणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना महत्त्वाचे निवेदन देत प्रशासनाने मॅपिंगसाठी नियुक्त केलेल्या बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. बीएलओ स्तरावर मॅपिंगच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत नागरिकांच्या घराघरांत जाऊन तात्काळ मॅपिंग करण्यात यावी तसेच संबंधित फॉर्मचे वितरणही त्वरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

हे निवेदन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम भाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार, इंटक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अथर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, मोईन कुरेशी, इंजिनिअर विशाल बनस्वाल, नदीम सौदागर, साजिद कुरेशी, मुजफ्फर खान, सय्यद जाकीर, आसमत खान, शेख रईस, मुनीर पटेल, इमरान शेख, साहेबराव बनकर, ऋषिकेश महाजन, शेख कैसर बाबा, गणेश जाधव, योगेश थोरात, रामभाऊ लोखंडे, शेख जाहीर, शेख आबेद, शफिक शहा, सय्यद फयय्याजुद्दीन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; प्रशासन याकडे काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.