AIMIMची स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली; इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत देशभक्तीचा जागर

AIMIMची स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली; इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत देशभक्तीचा जागर
AIMIMची स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली; इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत देशभक्तीचा जागर

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- AIMIMकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त AIMIMच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. बुढ्ढी लेन येथील दारुस्सलाम कार्यालयात सकाळी १० वाजता खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर दारुस्सलाम कार्यालयातून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात राष्ट्रध्वज घेत सहभागी नागरिकांनी उत्साहात शहरातील विविध मार्गांवरून रॅली काढली.

रॅलीदरम्यान देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप खासदार इम्तियाज जलील यांच्या मन्नत येथील निवासस्थानी करण्यात आला.