सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार! उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार! उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर, दि.११ :- राज्य शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या मोठ्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष आ. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे घरगुती अर्थकारणावर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या आंदोलनात आजी-माजी आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, विविध निवडणुकांतील उमेदवार, ज्येष्ठ नेते तसेच युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, महिला काँग्रेस, INTUC यांसारख्या फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच अल्पसंख्यांक, OBC, अनुसूचित जाती-जमाती विभाग तसेच विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी केले आहे.

यावेळी इंजिनिअर इफ्तेखार शेख (माजी प्रदेश महासचिव, MPCC) यांनीही कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

👉 “सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा स्वयंपाकघराचा बजेट कोलमडला; आता जनता रस्त्यावर उतरणार!” अशी प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

— वाचा आणि शेअर करा : ‘महाराष्ट्र वाणी’