शहरात मायनॉरिटी कौन्सिलचे आरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न; अधिकारांसाठी संघटित होण्याचे आवाहन

शहरात मायनॉरिटी कौन्सिलचे आरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न; अधिकारांसाठी संघटित होण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २५ :- मायनॉरिटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, जिल्हा औरंगाबाद युनिटतर्फे आरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शहरातील फातिमा हॉल, जिन्सी मैदान येथे करण्यात आले. या शिबिरात औरंगाबाद युनिटचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये आरक्षणाचे महत्त्व, त्याची गरज तसेच समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संघटनेचे कार्याध्यक्ष शेख मसूद यांनी मुद्देसूद भाषण करत आरक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि समाजाला ते कशा प्रकारे लाभदायक ठरू शकते, याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्तार शेख यांनी संघटनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. शहराध्यक्ष शेख बाबा यांनी समाजाने संघटनेला पाठिंबा देत आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची गरज व्यक्त केली. रमजानी खान यांनी सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला, तर प्रा. जिया सर यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देत कार्याध्यक्षांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साजीद पटेल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जाफर खान, राज मोहम्मद, नजीर फारुकी, अझर शेख, सय्यद मुक्तार, आवाज पटेल, अॅड. शाहिस्ता, महेजाबीन मॅडम, अहमद पटेल, मुजम्मील खान, शेख बाबा, शेख मोहसीन, मोहसीन नदवी, अंजू लीडर, साकी अहमद, आजी पटेल आदींनी विशेष परिश्रम घेतले.

पुढील बैठक कटकट गेट येथील प्राईम स्टार स्कूलमध्ये शनिवार, दि. २ मे रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

➡️ “हक्कांसाठी एकत्र या, संघटित व्हा आणि आपला आवाज बुलंद करा,” असा संदेश शिबिरातून देण्यात आला.