"वैध मालमत्ता पाडणे थांबवा!" – अंबादास दानवे यांचा मनपाला इशारा

दलालशाहीचा आरोप, भरपाईसंदर्भात प्रशासनाला जाब

"वैध मालमत्ता पाडणे थांबवा!" – अंबादास दानवे यांचा मनपाला इशारा
"वैध मालमत्ता पाडणे थांबवा!" – अंबादास दानवे यांचा मनपाला इशारा

 महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), ८ ऑगस्ट :- शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली नागरिकांच्या वैध मालमत्ता तोडल्या जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. महापालिकेने विकासाच्या नावाखाली केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत दानवे यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले.

 "मनपा मनमानी पद्धतीने कोणाचीही वैध मालमत्ता पाडू शकत नाही, नोटीस न देता कारवाई म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे," असा जोरदार इशारा त्यांनी दिला.

 कारवाईसंदर्भात दानवे यांचे थेट सवाल:

महापालिकेने किती वैध आणि किती अवैध बांधकामे पाडली याची नोंद आहे का?

पाडलेल्या वैध मालमत्तांना भरपाई कशी आणि किती दिली जाणार?

भूसंपादन झाल्यास मोबदला रोख स्वरूपात की योजनांच्या माध्यमातून?

यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची भरपाई देण्याची तयारी दाखवत, “नागरिकांना न्याय मिळेल,” अशी ग्वाही दिली.

⚠️ मनपातील दलालशाहीचा गंभीर आरोप

दानवे यांनी बैठकीत मनपामध्ये दलालांची सुसाट वाढ झाली असून, कोणतीही फाईल मंजूर करण्यासाठी दलालांचा आधार घ्यावा लागतो, असा गंभीर आरोप केला. "टीडीआरसारख्या महत्त्वाच्या कामांसाठीही दलालांशिवाय काम होत नाही," अशी तक्रार त्यांनी मांडली.

🎯 विकासाला विरोध नाही, अन्यायाला विरोध हवा!

दानवे यांनी स्पष्ट केले की, शहर विकासासाठी अतिक्रमण हटवणे गरजेचे आहेच. मात्र, सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होता कामा नये. रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली कोणाचे नुकसान होत असेल तर त्यांना भरपाई मिळावी, असा त्यांच्या भूमिकेचा स्पष्ट पुनरुच्चार केला.

🙋 उपस्थित मान्यवर

या बैठकीस उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, दिग्विजय शेरखाने, राजेंद्र दानवे, नितीन पवार आणि संजय हरणे आदी उपस्थित होते.

👉 बातम्या चालू ठेवा, महाराष्ट्र वाणीवर!

(शहरवासीयांच्या न्यायासा

ठीचा आवाज आम्ही पोहोचवत राहू.)