स्व. अजितदादा पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; जबाबदारांवर FIR दाखल करा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची मागणी

स्व. अजितदादा पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; जबाबदारांवर FIR दाखल करा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची मागणी
स्व. अजितदादा पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; जबाबदारांवर FIR दाखल करा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची मागणी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. २८ :- स्व. Ajit Pawar यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, अजितदादा पवार यांचे निधन हे केवळ एका व्यक्तीचे नुकसान नसून समाज आणि राज्यासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या मृत्यूबाबत सध्या जनमानसात अनेक शंका-कुशंका उपस्थित होत असून प्राथमिक माहिती आणि परिस्थितीनुसार हा मृत्यू नैसर्गिक नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा निव्वळ अपघात नसून VSR कंपनीचा निष्काळजीपणा, तसेच Directorate General of Civil Aviation (DGCA) कडून झालेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे DGCA च्या अहवालातून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच विमान उड्डाणासाठी हवामान अनुकूल असल्याचा ‘ग्रीन सिग्नल’ देणारी अॅरो कंपनीही या घटनेला तेवढीच जबाबदार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे VSR कंपनी, DGCA, अॅरो कंपनी आणि इतर संबंधितांवर तातडीने FIR दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासावर कोणताही दबाव येऊ नये, अन्यथा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास जनतेच्या संतापाची जबाबदारी संबंधितांवरच राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

या वेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर दादा सोनवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकभाऊ पाथ्रीकर, ज्येष्ठ नेते पुंडलिक अंभोरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पवार, मुलचंद पवार, उद्धव बनसोडे, सतीश देशमुख, प्रभाकर भोसले, अशोक बनकर, सोमीनाथ शिराणे, अशोक खोसरे, राजेंद्र चव्हाण, प्रशांत जगताप, भूषण तांबे, सुशील बोर्डे, विलास मगरे, रवींद्र वीर, संदीप जाधव, जावेद मदार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“स्व. अजितदादा पवार यांच्या मृत्यूमागील सत्य समोर येणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे, हीच जनतेची अपेक्षा आहे.”