लिंबेजळगाव येथे AIMIM ची जाहीर सभा; इम्तियाज जलील यांचे जोरदार भाषण, उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ४ —
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या प्रचाराला वेग आला असून, या पार्श्वभूमीवर AIMIM महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार मा. श्री. इम्तियाज जलील यांनी लिंबेजळगाव येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित केले.
या सभेत त्यांनी जनतेशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले. ग्रामीण भागातील विकास, मूलभूत सुविधा, शेतकरी, युवकांचे रोजगार आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींबाबत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी AIMIM ला संधी देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या सभेत AIMIM चे अधिकृत उमेदवार
श्री. अनिल पुंजा साळवे (जिल्हा परिषद उमेदवार) आणि
सौ. शाईनाज युनूस पटेल (पंचायत समिती उमेदवार) हे प्रमुख उपस्थित होते.
उमेदवारांनी देखील नागरिकांशी संवाद साधत आपल्या विकासात्मक योजना आणि जनतेसाठीचे उद्दिष्ट मांडले. गावातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत AIMIM ला पाठिंबा दर्शविला. संपूर्ण सभास्थळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
निवडणुकीच्या रणधुमाळीत लिंबेजळगावची ही सभा राजकीय समीकरणे बदलणारी ठरेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.