राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आढावा बैठक यशस्वी — आमदार चंद्रकांत दानवे यांचा भव्य सत्कार
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ७ जून :- आज एन-11 हडको येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचा ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बैठकीमध्ये बोलताना आमदार दानवे यांनी सांगितले की, आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महानगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने मेहनत घेणे गरजेचे आहे. आदरणीय पवार साहेबांचे विचार आणि पक्षाच्या माध्यमातून झालेली लोकहिताची कामे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची त्यांनी गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे स्वागत जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी करताना सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
या बैठकीचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन राहुल ताठे यांनी केले. आभार प्रदर्शन युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांनी केले.
या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यात मा.आमदार किशोर पाटील, मा.आमदार संजय वाघचौरे, मा.मंत्री जयसिंगराव गायकवाड, मा.जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंभिरे, प्रदेश उपाध्यक्ष इलियास भाई किरमाणी, सरचिटणीस विलास चव्हाण, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले, युवक व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी, शहर व तालुकास्तरीय नेते आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष संघटन बळकट करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.