मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला वेग; जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी, मतदारांशीही साधला संवाद

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला वेग; जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी, मतदारांशीही साधला संवाद
मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला वेग; जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी, मतदारांशीही साधला संवाद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ४ :– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज शहरातील विविध भागांना भेट देत प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) गृहभेटींची तपासणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधत प्रक्रियेची माहितीही घेतली.

चिकलठाणा, शेंद्रा आणि नक्षत्रवाडी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या पुनरीक्षण प्रक्रियेचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार बिडवे, स्थानिक कर्मचारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मतदारांशी संवाद साधत याद्यांच्या अचूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. सध्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम सुरू असून दि. २९ पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे.

तुमच्या परिसरातही बीएलओ भेट देऊ शकतात; मतदार यादीत योग्य माहिती सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करा.