मराठवाडा विद्यापीठात ११६ शिक्षकांची भरती; ३२ हजार वेतनावर संधी, लेखी परीक्षा अनिवार्य!

३० जून ते १५ जुलै ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; ३८ विभागांमध्ये सहायक प्राध्यापक पदे भरणार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे एकत्रित निधीतून ११ महिन्यांच्या कालावधीसाठी ११६ सहायक प्राध्यापक पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी दरमहा ३२ हजार रुपये वेतन देण्यात येणार असून उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

विद्यापीठातील ३० विभाग, धाराशिव उपपरिसरातील ७ विभाग तसेच दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र मिळून एकूण ३८ विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ३० जून ते १५ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज करायचा असून २० जुलैपर्यंत कागदपत्रांसह अर्जाची हार्डकॉपी सादर करावी लागणार आहे.

दरम्यान, विद्यापीठातील शिक्षकांच्या ७३ कायम पदांसाठीही भरती प्रक्रिया सुरू असून प्राध्यापक पदांसाठी मुलाखतींनाही सुरुवात झाली आहे.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी – तुमच्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी!