पदवीधरांचे प्रश्न, रोजगार आणि युवकांचे भविष्य; डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा वकील बांधवांशी संवाद

पदवीधरांचे प्रश्न, रोजगार आणि युवकांचे भविष्य; डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा वकील बांधवांशी संवाद
पदवीधरांचे प्रश्न, रोजगार आणि युवकांचे भविष्य; डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा वकील बांधवांशी संवाद

महाराष्ट्र वाणी

 संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील जिल्हा वकील संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वकील बांधवांशी संवाद साधत पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार आणि युवकांसमोरील विविध समस्यांवर चर्चा केली.

समाजात वकील बांधवांचे स्थान महत्त्वाचे असून, संविधानिक मूल्यांचे जतन करण्यासह न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे, असे या संवादातून अधोरेखित झाले.

या भेटीदरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधरांच्या अपेक्षा, युवकांच्या समस्या आणि रोजगाराच्या संधी यांसह विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. पदवीधरांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

पदवीधरांचे हक्क, युवकांचे भविष्य आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने ही सदिच्छा भेट महत्त्वपूर्ण ठरली.

यावेळी जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. वकील बांधवांनी दिलेल्या वेळेबद्दल आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आभार व्यक्त केले.

पदवीधरांचे प्रश्न समजून घेणे, युवकांच्या भविष्याला दिशा देणे आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठवणे, या उद्देशाने संवादातून सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.