कॅब्रीज चौकात पोलिसांची धडक कारवाई! गावठी पिस्टलसह नेवासा येथील ३ आरोपी जेरबंद

कॅब्रीज चौकात पोलिसांची धडक कारवाई! गावठी पिस्टलसह नेवासा येथील ३ आरोपी जेरबंद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ११ :- शहरातील कॅब्रीज चौक परिसरात MIDC सिडको पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई करत गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि होंडा सिटी कारसह तीन आरोपींना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. कॅब्रीज चौक येथे तीन जण आपसात भांडत असल्याची माहिती मिळताच विशेष पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. झडतीदरम्यान आरोपींकडून १ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, ५ मोबाईल आणि एक होंडा सिटी कार असा एकूण ५.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये

शुभम संजय सोमासे (वय २५),

अशोक विष्णु आढरे (वय ३९),

अजय शिवाजी मगर (वय २६)

यांचा समावेश असून, यापैकी दोघे आरोपी आधीपासून गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC सिडकोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आणि विशेष पथकाने केली.

दरम्यान, आरोपींकडे आढळलेली गावठी पिस्टल नेमकी कुठून आणली, याचा सखोल तपास सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

👉 शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश — आता तपासातून कोणते मोठे रॅकेट उघड होणार?