काँग्रेस प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; नव्या टीमला डॉ. कल्याण काळेंकडून शुभेच्छा

काँग्रेस प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; नव्या टीमला डॉ. कल्याण काळेंकडून शुभेच्छा
काँग्रेस प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; नव्या टीमला डॉ. कल्याण काळेंकडून शुभेच्छा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा होताच, खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी आमेर अब्दुल सलीम यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी गौरव अशोक जैस्वाल आणि अजय डिडोरे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच प्रदेश सचिव म्हणून आकाश भोपळे (जालना), इरफान पठाण, गुरमीत गिल, दीपक कणसे, प्रतीक पाटील, मुजाहेद पटेल, मोहित जाधव, वसीम जमीनदार (जालना) आणि शोईब शेख यांची निवड करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल आणि राज्यात काँग्रेस अधिक बळकट होईल, असा विश्वास खासदार काळे यांनी व्यक्त केला. तसेच नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे लढा दिला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“नव्या नेतृत्वासोबत काँग्रेसचा लढा अधिक धारदार होणार, अशीच जनतेची अपेक्षा!”