काँग्रेस दिव्यांग सेलच्या औरंगाबाद मध्यवर्ती विधानसभा अध्यक्षपदी शेख रबीब यांची नियुक्ती
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ४ :- काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या हस्ते सोमवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजता काँग्रेस दिव्यांग सेलच्या औरंगाबाद मध्यवर्ती विधानसभा अध्यक्षपदी शेख रबीब यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील सामाजिक आणि संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी, शहराध्यक्ष मिर्झा झाकी बेग, मोहम्मद झाकीर तसेच डॉ. शहादाब श्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी शेख रबीब यांचे अभिनंदन करत दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.