काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मोईन शेख हरसुलकर यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि २३ :- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ, एकनिष्ठ पदाधिकारी तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोईन शेख हरसुलकर यांची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून सातत्याने काँग्रेसची सेवा करणाऱ्या हरसुलकर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व शहर प्रभारी माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, खासदार डॉ. कल्याण काळे व शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख (भैया) यांच्या हस्ते दिनांक २२ रोजी कांग्रेस आढावा बैठकी दरम्यान गांधी भवन येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनाबाबत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ (भैया), ॲड. सय्यद अक्रम, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. जफर खान यांच्यासह शहर व जिल्ह्यातील विविध सेल व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.