नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत धक्का की यश? ‘जय-पराजय’ची मोठी यादी समोर!

नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत धक्का की यश? ‘जय-पराजय’ची मोठी यादी समोर!

✍️ महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांच्या कुटुंबीयांनीही आपले राजकीय नशीब आजमावले. काहींना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला, तर काही दिग्गजांच्या नातेवाईकांना निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला.

विशेष म्हणजे मंत्री, आमदार, माजी खासदार आणि जिल्हाध्यक्षांच्या घरातील उमेदवारांनाही मतदारांनी थेट निकालातून संदेश दिल्याचे चित्र आहे.

नेत्यांच्या नातेवाईकांचा जय-पराजय (यादी)

पराभूत उमेदवार

🔻 भारती गोरे – मंत्री जयकुमार गोरे यांचे नातेवाईक

➡️ कुकुडवाड जि.प. गट (माण) – पराभव

🔻 मंत्री जयकुमार गोरे यांच्या भावजय

➡️ औंध जि.प. गट (सातारा) – पराभव

🔻 प्राची नरेंद्र पाटील – माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी

➡️ मुंद्रळ कोळे जि.प. गट – पराभव

🔻 समशेर वरपूडकर – माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे पुत्र

➡️ शिंगणापूर जि.प. गट – पराभव

🔻 सोनल देशमुख – माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची कन्या

➡️ झरी जि.प. गट – पराभव

🔻 प्रेरणा वरपूडकर – माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची सून

➡️ दैठणा जि.प. गट – पराभव

🔻 जीवन जानकर – आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र

➡️ दहिगाव जि.प. गट (सोलापूर) – पराभव

🔻 संतोष पाटील – राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू

➡️ नरखेड जि.प. गट – पराभव

🔻 सरिता भिसे – माजी आमदार त्र्यंबक भिसे यांची भावजय

➡️ कामखेडा जि.प. गट (लातूर) – पराभव

🔻 सुप्रिया शृंगारे पायाळ – माजी खासदार सुधाकर शृंगारे यांची कन्या

➡️ रोहिना जि.प. गट – पराभव

🔻 सदिच्छा विनोद माने – माजी आमदार दिनकर माने यांची सून

➡️ आशिव जि.प. गट – पराभव

विजयी उमेदवार

✅ अजित वरपूडकर – माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे पुतणे

➡️ परभणी जिल्हा परिषद – विजय

✅ संस्कृती सातपुते – माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी

➡️ दहिगाव जि.प. गट (सोलापूर) – विजय

✅ सूरज पाटील – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव

➡️ पंचायत समिती निवडणूक – विजय

✅ मोहिनी खोत – आमदार सदाभाऊ खोत यांच्या सून

➡️ बागणी जि.प. गट (सांगली) – विजय

✅ अब्दुल आमेर – आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव

➡️ अंभई जि.प. गट – विजय

✅ राणी पाटील – माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सून

➡️ सांगोला पंचायत समिती – विजय

✅ शांभवी कल्याणशेट्टी – आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी

➡️ चपळगाव जि.प. गट – विजय

✅ सागर कल्याणशेट्टी – आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू

➡️ चपळगाव पंचायत समिती गण – विजय

✅ शीतल म्हेत्रे – माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या

➡️ तोळनूर पंचायत समिती गण – विजय

✅ शिवराज म्हेत्रे – माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मुलगा

➡️ सलगर जि.प. गट – विजय

✅ डॉ. पृथ्वीराज माने – माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र

➡️ कोंडी जि.प. गट – विजय

✅ इंद्रजित पवार – माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू

➡️ बीबी दारफळ जि.प. गट – विजय

✅ लक्ष्मी रतिकांत पाटील – माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी

➡️ हत्तूर जि.प. गट – विजय

✅ आकांक्षा चौगुले – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी

➡️ आलूर पंचायत समिती गण – विजय

✅ कृष्णा रोचकरी – सीमा माडजे-रोचकरी यांचे भाऊ

➡️ आरळी पंचायत समिती गण – विजय

✅ विकास गोगावले – मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र

➡️ नाडगावतर्फे बिरवाडी (रायगड) – विजय

मतदारांचा स्पष्ट संदेश!

या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे—नाव मोठं असलं तरी मतदार विकास आणि स्थानिक कामगिरीवरच निर्णय घेत आहेत. अनेक दिग्गजांच्या घरातील उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, तर काहींना मोठं यश मिळालं.

अशाच राजकीय अपडेट्ससाठी वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’! 🔥