ईद-ए-मिलादनिमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटतर्फे सामाजिक उपक्रम : रुग्णांना फळवाटप, अनाथाश्रमात अन्नदान

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे (प्रतिनिधी शंकर जोग)दि ५ :- मोहम्मद पैगंबरांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद निमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेतर्फे पुण्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

सकाळी कुराण पठणानंतर रास्ता पेठ येथील शेठ ताराचंद रामानाथ धर्मादाय रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे ख्रिश्चन अनाथ आश्रमात व फुटपाथवरील गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचेही वाटप विविध मान्यवरांना करण्यात आले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर, प्रमुख सल्लागार राजेंद्रसिंह वालिया, शहाजी सावंत, नाहीद मुजावर, मजहर खान, सुलतान नाजा, एजाज सय्यद, मुस्ताक जिकरे, बशीर शेख, वसीम शेख, हमीद काझी, आबुभाई इनामदार, असलम खान, अकबर खान, मकरुद्दीन शेख, युनूस मणियार, श्याम मोहम्मद, फहीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

👉 ‘धर्म आणि समाजासाठी सेवा हाच खरा उत्सव’ हा संदेश यानिमित्त देण्यात आला

.