अंभई ग्रामपंचायतीत महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्र वाणी
अंभई, ता. सिल्लोड दि. १९ :- अंभई येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज महात्मा बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. समाजात समता, बंधुता आणि सत्य आचरणाचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर तसेच पराक्रम, शौर्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान परशुराम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, समाज बांधव तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत सामाजिक ऐक्य व सद्भावनेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प केला.
"महापुरुषांच्या विचारांची जपणूकच समाजाच्या उज्ज्वल भविष्याची खरी दिशा ठरते."