अंभईचे पोलीस पाटील दगडू मैद यांचा पोलीस विभागाकडून गौरव!

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल; उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत बाइंगडे यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान

अंभईचे पोलीस पाटील दगडू मैद यांचा पोलीस विभागाकडून गौरव!
अंभईचे पोलीस पाटील दगडू मैद यांचा पोलीस विभागाकडून गौरव!

सिल्लोड (प्रतिनिधी) दि २२ :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील पोलीस पाटील दगडू तुळशिराम मैद यांनी कर्तव्यनिष्ठेने आणि तत्परतेने बजावलेल्या कामगिरीची पोलीस विभागाने दखल घेत त्यांचा प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये अंभई येथे हिंदू-मुस्लिम वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीत दगडू मैद यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन संबंधित आरोपी निष्पन्न करण्यासाठी मदत केली. तसेच, इतर कामांमध्येही सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडले.

त्यांच्या या भरीव व उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपविभागीय पोलीस कार्यालय, सिल्लोड यांच्या वतीने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत बाइंगडे यांच्या स्वाक्षरीने व विषेश पोलीसमहानिरीक्षक यांच्या हस्ते हे प्रशंसापत्र देण्यात आले.

पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावताना दाखवलेली तत्परता, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची दखल घेत पोलीस विभागाने केलेल्या या गौरवामुळे दगडू मैद यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित