स्व. दादासाहेब पालोदकरांचा शेतकरीवारसा उध्वस्त करणाऱ्यांना जागा दाखवा; शिवसेना उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – आमदार अब्दुल सत्तारांचे आवाहन

स्व. दादासाहेब पालोदकरांचा शेतकरीवारसा उध्वस्त करणाऱ्यांना जागा दाखवा; शिवसेना उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – आमदार अब्दुल सत्तारांचे आवाहन
स्व. दादासाहेब पालोदकरांचा शेतकरीवारसा उध्वस्त करणाऱ्यांना जागा दाखवा; शिवसेना उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – आमदार अब्दुल सत्तारांचे आवाहन

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड, दि. २ :- स्व. माणिकराव (दादासाहेब) पालोदकर यांनी शेतकऱ्यांसाठी उभा केलेला सिद्धेश्वर साखर कारखाना उध्वस्त करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे. दादासाहेबांचा विकासाचा वारसा जपण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे ठाम आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उमेदवार देविदास माणिकराव पालोदकर तसेच पालोद गणाचे उमेदवार मधुकर गवळी व निजाम पठाण यांच्या प्रचारार्थ पालोद (ता. सिल्लोड) येथे गाव बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, स्व. दादासाहेब पालोदकर यांनी शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले. त्यांनी उभा केलेला सिद्धेश्वर साखर कारखाना हा केवळ उद्योग नव्हता, तर हजारो शेतकऱ्यांचा आधार होता. मात्र काही स्वार्थी लोकांनी हा कारखाना उध्वस्त करण्याचे पाप केले. अशा लोकांना आता लोकशाही मार्गाने उत्तर देण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेचे उमेदवार हे दादासाहेबांच्या विचारांचे वारसदार असून विकासाची घडी पुन्हा मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी उपस्थितांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

— विकासाच्या लढाईत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे आता मतपेटीतून स्पष्ट होणार आहे.