"संघर्ष समितीची घोषणा : शेतकरी २८ ऑक्टोबरला मुंबईत रस्त्यावर उतरणार"

"संघर्ष समितीची घोषणा : शेतकरी २८ ऑक्टोबरला मुंबईत रस्त्यावर उतरणार"
"संघर्ष समितीची घोषणा : शेतकरी २८ ऑक्टोबरला मुंबईत रस्त्यावर उतरणार"

छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २५ :- शेतकरी कर्जमाफी, हमीभाव व इतर तातडीच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत आज छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला असून “शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती” स्थापन करण्यात आली आहे.

बैठकीत पुढील ठराव घेण्यात आले :

1. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन.

2. राज्यातील सर्व विभागनिहाय संयुक्त परिषदांचे आयोजन.

3. शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन.

4. शेतकरी-मजुरांच्या प्रश्नांवर संघर्ष समितीमार्फत लढा.

5. प्रमुख मागण्या –

शेतकरी कर्जमुक्ती

सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव

बोगस खते व बियाण्यांवर नियंत्रण

शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन

कृषीनिविष्ठा GST मुक्त करणे

गाव पातळीवर पीकविमा व बियाणे-खते तपासणी प्रयोगशाळा

बैठकीस विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव आदी शेतकरी नेते उपस्थित होते. तर राजू शेट्टी व राजेश टोपे यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई निर्णायक ठरेल, असा सूर बैठकीत उमटला.

 “आता लढा अंतिम – शेतकऱ्यांच्या न्यायासाठी!”