शरद पवारांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पूरग्रस्तांना मदतीचे आव्हान!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व ग्रामीण जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे नेते, पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या परीने शक्य तितकी मदत करावी.
दि. २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जीवनावश्यक साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्य जमा करण्याचे ठिकाण : राष्ट्रवादी भवन, हडको, एन-११, छत्रपती संभाजीनगर.
या उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शराफोद्दीन मुल्ला, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण व शहर कार्याध्यक्ष आशिष पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.