राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे २१८ इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल; उद्या खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते ‘बी-फॉर्म’ वाटप

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्याकडे शहरातील एकूण २१८ इच्छुक उमेदवारांचे अर्ज (फॉर्म) अधिकृतरित्या जमा करण्यात आले.

या प्रक्रियेदरम्यान शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख उर्फ मुन्नाभाई तसेच विनोद खामगावकर हे उपस्थित होते. इच्छुक उमेदवारांनी मोठ्या विश्वासाने व उत्साहाने आपले अर्ज सादर केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, उद्या दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते अधिकृत उमेदवारांना ‘बी-फॉर्म’चे वाटप करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून, आगामी निवडणुकीत पक्ष ताकदीने मैदानात उतरण्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.

— राजकीय घडामोडींच्या ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा!