मोबाईल हिसकावणारा सराईत आरोपी गुन्हे शाखेकडून अटकेत

मोबाईल हिसकावणारा सराईत आरोपी गुन्हे शाखेकडून अटकेत

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ :- शहरातील मोबाईल हिसकावण्याच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

जवाहरनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 172/2026 अन्वये कलम 304(2), 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी नंदकिशोर लक्ष्मण कुंजर (वय 47), व्यवसाय डिलिव्हरी बॉय, रा. उद्योगनगर, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली होती.

हा प्रकार 8 मे 2026 रोजी पहाटे 2.05 वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना 14 मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीस गेलेला मोबाईल रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मुकेश उर्फ मुक्या महेंद्र साळवे (वय 26, रा. स्मशानभूमीजवळ, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) याने चोरला आहे.

माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीतील मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम तसेच राजेंद्र साळुंके, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, मनोहर गिते आणि विक्रम खंडागळे यांनी सहभाग घेतला.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुन्हेगारांवर पोलिसांचा वाढता दबाव कायम असून शहरातील गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष मोहिमा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.