"महिलांच्या सक्षमीकरणासाठी आजाद समाज पार्टीचा कोंढव्यात मोफत प्रशिक्षण उपक्रम"

"महिलांच्या सक्षमीकरणासाठी आजाद समाज पार्टीचा कोंढव्यात मोफत प्रशिक्षण उपक्रम"

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे (प्रतिनिधी शंकर जोग) दि १८ :- येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीतर्फे कोंढवा येथे महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वेलकम हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास सुमारे 800 महिलांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात ब्युटी पार्लर, शिवणकाम, मेहंदी, पाककला यांसह अनेक कोर्सविषयी माहिती देण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार असल्याची माहिती आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी दिली.

आजाद समाज पार्टी मागील दहा वर्षांपासून सामाजिक कार्य करत असून, महिलांना अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष ॲड. सुलतान फते अली शहा, पुणे जिल्हाध्यक्ष भीमराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष सैफ शेख यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

.्