महाराष्ट्र दिनी 11 पोलीस अधिकारी-अंमलदारांना महासंचालक पदक जाहीर; उद्या सन्मान सोहळा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :– महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी मा. पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी बजावलेल्या कर्तव्यनिष्ठ सेवेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
सन्मानित अधिकारी/अंमलदारांची नावे पुढीलप्रमाणे :
पोलीस निरीक्षक प्रविणा यादव
ग्रेड पोलीस उपनिरीक्षक (GPSI) नारायण पुरके
ग्रेड पोलीस उपनिरीक्षक (GPSI) हरिष खटावकर
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुधाकर मिसाळ
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) महेंद्र चव्हाण
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) दिलीप मोदी
पोलीस हवालदार (HC) संजय गावंडे
पोलीस हवालदार (HC) अश्रफ सय्यद
पोलीस हवालदार (HC) प्रकाश गायकवाड
पोलीस हवालदार (HC) शफीक शेख
पोलीस अंमलदार (PC) चत्तरसिंग जारवाल
या सर्वांनी गुन्हे अन्वेषण, सायबर गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण तसेच जनजागृती उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य करत पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना महासंचालक पदकाने गौरविण्यात येत आहे.
उद्या (दि. 1 मे) महाराष्ट्र दिनानिमित्त या सर्व सन्मानित अधिकारी व अंमलदारांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा सोहळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर (परिमंडळ-1), प्रशांत स्वामी (परिमंडळ-2), शर्मिष्ठा वालावलकर (मुख्यालय), रत्नाकर नवले (गुन्हे) तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना हीच खरी ताकद असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
👉 कर्तव्य आणि धाडसाची हीच खरी ओळख; अशा जवानांमुळेच सुरक्षित समाजाची उभारणी!