महायुतीत धुसफूस शिगेला! बोगस मतदारयादीवरून ‘सत्ताधाऱ्यांचे मित्रपक्ष’ चिंतेत – रोहित पवारांचा टोला

महायुतीत धुसफूस शिगेला! बोगस मतदारयादीवरून ‘सत्ताधाऱ्यांचे मित्रपक्ष’ चिंतेत – रोहित पवारांचा टोला

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २ :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

स्थानिक निवडणुकांमध्ये युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका बसून “गेम होईल” या भीतीने सत्तेतील इतर दोन मित्रपक्ष प्रचंड चिंतेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पवार म्हणाले, “कालचा आमचा मोर्चा पाहून सत्ताधारी मित्रपक्षातील काहींचे फोन आले. दुबार आणि बोगस मतदार रोखण्यासाठी त्यांनी चर्चा केली. विधानसभेला गार गार वाटणारा मतदारयाद्यांचा घोळ आता मात्र अवघड जागेचं दुखणं ठरलंय.”

पुढे बोलताना त्यांनी महायुतीतील तणाव उघड करत म्हटलं की, “महायुतीत प्रचंड धुसफूस आहे. एवढी की MOA च्या निवडणुकीसाठी सुद्धा अजित दादांना दोनदा बैठक घ्यावी लागली. सर्वत्र भाजप हस्तक्षेप करत आहे. दोन्ही मित्रपक्षांची utility भाजपसाठी संपल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. अमित शहा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘कुबड्या’ काढून फेकण्याचीच ही नांदी म्हणावी लागेल. आता या कुबड्या अडकवल्या जातील की चुलीत पेटवल्या जातील, हेच बघायचं आहे.”

राज्याच्या राजकारणात ‘कुबड्यांचा खेळ’ नेमका कुठे थांबतो, हेच आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.