मराठवाड्यात उत्साहाचा माहोल – एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्यात तब्बल 1680 युवकांना मिळाला रोजगार!
महाराष्ट्र वाणी न्युज
संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ५ (प्रतिनिधी) –
मराठवाड्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधींचा मोठा मेळावा शनिवारी एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनच्या वतीने एमआयटी कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या *‘महारोजगार मेळावा’*त हजारो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तर तब्बल १,६८० युवकांना तत्काळ रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या.
मेळाव्याचे उद्घाटन एमआयटी कॉलेज संस्थेचे सचिव मुनिष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शंभरहून अधिक नामांकित खाजगी कंपन्यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मुनिष शर्मा म्हणाले, “आज भारताला स्किल्स असलेल्या कामगारांची नितांत गरज आहे. अशा उपक्रमांमुळे देशाच्या प्रगतीला गती मिळते.” त्यांनी विद्यार्थ्यांना एमआयटी कॉलेजमधील नव्याने सुरू झालेल्या सहा महिन्यांच्या व एक वर्षांच्या स्किल्स कोर्सचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.
फाऊंडेशनचे सचिव मुकीम देशमुख यांनी सांगितले की, संस्थेचे काम कृषी, रोजगार, वैद्यकीय आणि शिक्षण या चार क्षेत्रांत सुरू असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य फाऊंडेशन करते. त्यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याने लवकरच अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष अश्फाक पटेल, उपाध्यक्ष जाकेर पटेल, करीम पटेल, अ. रहीम मोगल, डॉ. शोएब हाश्मी, बशीर पटेल, फेरोज पटेल, जावेद पटेल, बॅ. उमर फारुकी, युसुफ पटेल आणि फाऊंडेशनचे संचालक यांनी परिश्रम घेतले.
🔸 एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनचा रोजगार मेळावा ठरला युवकांसाठी ‘सुवर्णसंधी’!