मनपा विद्यार्थी खेळले अंतरराष्ट्रीय हॉकी टर्फवर

मनपा विद्यार्थी खेळले अंतरराष्ट्रीय हॉकी टर्फवर
मनपा विद्यार्थी खेळले अंतरराष्ट्रीय हॉकी टर्फवर

 महाराष्ट्र वाणी न्युज 

 संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या "आम्हाला खेळू द्या" या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील शासनाचे शालेय मनपा हद्दीतील जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेत मनपा केंद्रीय शाळा किराडपुरा नं.1 ऊर्दू शाळेतील 15 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुली या संघानी सहभाग घेतला आहे.

जी.श्रीकांत यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेने आपल्या महानगरपालिकेचे विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय हॉकी खेळपट्टीवर खेळले. आपल्या महानगरपालिकेचे विद्यार्थ्यांनी कधी हे आंतरराष्ट्रीय खेळपट्टी बघितली सुद्धा नव्हती. आज त्यांनी या आंतरराष्ट्रीय हॉकी खेळपट्टीवर खेळण्याची संधी त्यांना मिळाली. 

हि स्पर्धा Sports Authority of India, National Centre of Excellence, Chhatrapati Sambhajinagar या ठिकाणी सुरू आहे. केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती रईसा बेगम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रशिक्षक शेख आखेब जावेद हे परिश्रम घेत आहे.