मध्यरात्री LCBची धडक कारवाई! गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद

मध्यरात्री LCBची धडक कारवाई! गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद
मध्यरात्री LCBची धडक कारवाई! गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ५

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक–2026 च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रधारी व गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई सुरू केली आहे.

मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गस्त वाढविण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री 00:45 वाजता केलेल्या धडक कारवाईत एक तरुण गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे.

दिनांक 04/02/2026 रोजी रात्री पाचोड परिसरात LCBचे सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, रोहिलागड फाटा परिसरात एक संशयित इसम कमरेला गावठी कट्टा लपवून फिरत आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचत कारवाई केली.

रात्री अचूक 00:45 वाजता संशयित इसम आढळून आला. पोलिसांनी अचानक झडप घालून त्यास ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान कथ्याच्या रंगाची मुठ असलेला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस अवैधरित्या सापडले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपले नाव विशाल लहु पालवे (वय 25), रा. देशगव्हान, ता. अंबड, जि. जालना असे सांगितले. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹42,000/- असून तो तात्काळ जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस ठाणे पाचोड येथे आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. अन्नपूर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहा. पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सचिन राठोड, विष्णु गायकवाड, सुनील गोरे, योगेश तरमळे यांनी यशस्वी केली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘झिरो टॉलरन्स’ संदेश स्पष्ट झाला असून गुन्हेगारांवर अशीच धडक कारवाई पुढेही सुरू राहणार आहे!