"पाडापाडी मोहिमेत बेघर झालेल्या बाधितांना मिळणार हक्कचे घर"- प्रशासक जी श्रीकांत

मनपाकडून एक कुटुंब, एक घर या योजनेअंतर्गत म्हाडाच्या १४८ घरांची उपलब्धता

"पाडापाडी मोहिमेत बेघर झालेल्या बाधितांना मिळणार हक्कचे घर"- प्रशासक जी श्रीकांत
"पाडापाडी मोहिमेत बेघर झालेल्या बाधितांना मिळणार हक्कचे घर"- प्रशासक जी श्रीकांत

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि 2७ :- शहरात सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे हजारो बांधकामे पाडली गेली असून शेकडो कुटुंबे बेघर होण्याच्या संकटात सापडली आहेत. या बाधितांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने नवी योजना जाहीर केली आहे. 

एक कुटुंब, एक घर या योजनेअंतर्गत म्हाडाच्या १४८ घरांची उपलब्धता करून ती बाधितांना मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भात शनिवारी (दि.२७) या मोहिमेत बेघर झालेल्या बाधितिंची महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

महापालिकेकडून शहरात जून महिन्यात रस्ता रुंदीकरणाची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत बीड बायपास, पैठण रोड, जालना रोड, रेल्वे स्टेशन ते महावीर चौक, पडेगाव–मिटमिटा रस्ता, दिल्लीगेट–हर्सूल टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट–सिडको बसस्टँड या मार्गावरील ५ हजारांहून अधिक बांधकामे पाडण्यात आली आहेत. यामुळे आंबेडकरनगर, नारेगाव, जयभवानीनगर, संजयनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, मिटमिटा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी या भागातील अनेक नागरिक बाधित झाले आहेत. यासोबतच झेंडा चौक ते विश्रांतीनगर रस्ता करताना अनेक घरे पाडावे लागले. या योजनेत या रस्त्यासाठी ज्यांचे घरे गेले त्यांचा देखील समावेश करण्यात आल्याचे जी श्रीकांत यांनी सांगितले.

 या मोहिमेत ज्यांचे संपूर्ण घर बाधित झाले, जे बेघर झाले आहेत. त्या बाधितांनाच या योजनेतून घर देण्यात येणार असून ज्यांची इतर ठिकाणी जागा किंवा प्लॉट आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

या योजनेची महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी बाधितांच्या बैठकीत घोषणा केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

-------

आवश्यक कागदपत्रांची यादी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेकडे खालील कागदपत्रे सादर करावी लागतील :

- उत्पन्नाचा दाखला ( तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न)

- इलेक्शन कार्ड

- वीज बिल

- आधार कार्ड

……………